बाल गोपाल गणेश मंडळ – विविध सामाजिक उपक्रम राबविणारे एक मंडळ !
३१वर्षांची परंपरा आजही कायम!
चंद्रपूर ⬜💠⬜किरण घाटे ⬜ सध्या शहरात गणेशोत्सव थाटात साजरा होतोय आहे.याच चंद्रपूर नगरीत १००पेक्षा अधीक गणेश मंडळांनी गणरायाची स्थापना केली आहे.शहरात सर्वत्र भक्तीमय वातावरण झाल्याचे दिसून येते.काही ठिकाणी सामाजिक कार्यक्रमांसोबतच भोजनदान कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
⬜🌀🌼स्थानिक पठाणपुरा मुख्य मार्गावरील निकालस मंदिराजवळ बालगोपाल गणेश मंडळाने या वर्षी देखील गणरायाची स्थापना केली आहे.
⬜🌀🌼गेल्या ३१ वर्षांपासुन हे मंडळ गणरायाची स्थापना करीत असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.



