



” त्या” घटनेंचा निषेध व्यक्त करत वंचित बहुजन महिला आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ! चंद्रपूर ⬜किरण घाटे⬜ वंचित बहुजन महिला आघाडी महानगर चंद्रपूरच्या वतीने आज गुरुवारी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना महिलांच्या अत्याचार बाबत व शिवाजी महाराज पुतळा कोसळण्याच्या संदर्भात निवेदने सादर करण्यात आली .अत्याचारांच्या घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली तर दुस-या एका निवेदनातून शिवाजी महाराज पुतळा कोसळण्या बाब नमूद करण्यात आली आहे.दरम्यान वंचित बहुजन महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी यावेळी आपला निषेध व्यक्त केला.निवेदन सादर करताना वंचित बहुजन महिला आघाडीच्या महानगर अध्यक्षा तनुजा रायपुरे, महानगर महासचिव मोनाली पाटील, उपाध्यक्षा सुलभा चांदेकर, सचिव पोर्णिमा जुनघरे, विजया भगत, ललीता दुर्गे, शोभा वाघमारे आदिं उपस्थित होत्या.
